महात्मा फुले पुण्यतिथी सोहळ्यास कटगुणमध्ये प्रारंभ

कटगूण ः महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करताना सभापती कल्पना मोरे, जि. प. सदस्य प्रदीप विधाते, उपसभापती संतोष साळुंखे, डॉ. शेख, लक्ष्मणराव पिसे, जे. व्ही. कापडे, उदय कदम व इतर मान्यवर

वडूज, दि. 25 (प्रतिनिधी)-महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 129 व्या पुण्यस्मरणानिमित्त कटगूण, ता. खटाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याचा आज प्रारंभ झाला. महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन व पुष्पहार अर्पण करुन विविध स्पर्धा, विविध उपक्रमांना प्रारंभ करुन सुरवात करण्यात आली.
यावेळी सभापती कल्पना मोरे, जि. प. सदस्य प्रदीप विधाते, उपसभापती संतोष साळुंखे, पंचायत समिती सदस्या निलादेवी जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पिसे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी जे. व्ही. कापडे, कटगुणच्या सरपंच मीनाताई जावळे, माजी उपसरपंच उदय कदम, माजी सरपंच सुधीर गोरे, लोकनियुक्त सरपंच जयश्री गोरे, उपसरपंच जयवंत फाळके, डॉ. विवेक गायकवाड, विस्तार अधिकारी सुजाता जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जि. प. सदस्य प्रदीप विधाते म्हणाले, महात्मा फुले यांनी महिलांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात स्त्रीला समान हक्क देण्याबाबतचे महत्वाचे कार्य कले आहे. त्यांचे विचार तळागाळा पर्यंत रुजवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहोत.
सभापती कल्पना मोरे म्हणाले, महात्मा जोतिराव फुले यांनी अनेक वर्षापुर्वी समाज प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्वत: शैक्षणिक क्रांती घडवून आणली. महिलांच्या सबलीकरणासाठी आम्ही त्यांची आरोग्य तपासणी करणार आहोत.
उपसभापती संतोष साळुंखे म्हणाले, फुले दाम्पत्याने आपले ज्ञानदानाचे काम कोणताही जातीभेद न करता सुरु ठेवले. त्यांच्या या ज्ञानदानामुळेच आजची स्त्री सर्वच क्षेत्रांमध्ये ÷उच्च पदावर चमकताना दिसत आहे. त्यांची कुलभूमी असलेल्या मतदारसंघाचे मला नेतृत्व करण्याची संधी माझ्या सारख्या कार्यकर्त्यांला मिळाली, हे माझे भाग्य समजतो. एकात्मिक बालविकास विभागाने अत्यंत नेटके नियोजन केले होते. शासनाच्या विविध योजनेसह विविध उपक्रम यावेळी प्रभावीपणे राबविले आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नवनाथ जाधव, प्रस्ताविक प्रा. टी. एस .गायकवाड, तर माजी उपसरपंच उदय कदम यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)