महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त कविसंमेलन

सासवड- समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने ग्रंथदिंडी, व्याख्यान, कविसंमेलन, साहित्य संमेलन तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. येथील पुरंदर शैक्षणिक संकुलामध्ये प्रा. केशव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि विद्यार्थी कविसंमेलनाचे आयोजित केले होते. सकाळी स्वामी विवेकानंद आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी प्राचार्य हनीफ मुजावर, प्रा. प्रतिभा म्हेत्रे, प्रा. रवीन जगदाळे, प्रा. निलेश जगताप, प्रा. वर्षा माने, प्रा. जयचंद चामवाड समवेत अन्य प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरंदरच्या सुता तुला शिवबाच वरदान, एक मुखाने बोला जय जय ज्योतिराम या प्रा. केशव काकडे रचित व प्रा. राजेंद्र बढे यांच्या गायनाने सुरुवात करण्यात आली. सुप्रिया खवले, प्रा. उज्वला बढे, प्रा. भानुदास कटके, नम्रता गौंडाळकर यांनी कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेश राणे यांनी केले तर प्रा. मधुकर पोवार यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)