महात्मा फुले जयंतीनिमित्त पदयात्रा

सांगवी – महात्मा फुले यांच्या 191व्या जयंतीनिमित्त नवी सांगवीमध्ये पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेच्या माध्यमातून महात्मा फुले यांचा संदेश जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पदयात्रेचे आयोजन मानवी हक्क संरक्षण आणि जागृती पिंपरी-चिंचवड शहर या संघटेनेच्या वतीने करण्यात आले होते.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करुन लहान मुले पदयात्रेत सहभागी झाली होती. तसेच मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी आपल्या कपड्यांवर शिक्षण, समानता आणि संविधानाचे महत्त्व पटवून देणारे संदेश लिहले होते. जात, धर्म, लिंग, पंथ असे भेदभाव मिटवून सर्वांना शिक्षण मिळालेच पाहिजे. सामाजिक न्यायबुद्धीने सर्वाना समान वागणूक मिळाली पाहिजे. शिक्षण हाच परिवर्तनाचा मार्ग आहे. शिक्षणाचा अधिकार हा मानवी अधिकार आहे अशा घोषवाक्‍यांनी ही पदयात्रा फेमस चौक, शिवनेरी चौक, राजमाता गार्डन पर्यंत काढण्यात आली.

यावेळी संस्थापक अध्यक्ष विलास कुचेकर, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष डॉ. अभिषेक हरिदास, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, मुरलीधर दळवी, संगीता जोगदंड, विलास शहाणे, महाराष्ट्र अध्यक्ष सतीश लालबिगे, ऍड. सचिन काळे आदी उपस्थित होते. या पदयात्रेत सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांच्या वेशभूषेतील मुले सर्वांचे आकर्षण ठरली. दरवषी पुण्यातील भिडेवाडा येथे जाऊन सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी जनजागृती करीत असल्याचे अण्णा जोगदंड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)