निमसाखर- शेळगाव (ता. इंदापूर) येथील प्रगतशील द्राक्ष उत्पादक शेतकरी सुभाष गुलाब दुधाळ यांना महात्मा फुले कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे. श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने क्रांती ज्योती महात्मा फुले यांचे जन्म गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी आयोजित कार्यक्रमात माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सुभाष दुधाळ यांनी पुरस्काराने प्रदान करण्यात आला. याप्रसंगी श्री संत सावतामाळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड, राज्य सचिव सुनील गुलदगड,महीला आघाडीच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अनुराधा गडगे, सोलापूर जिल्हा परिषद अरूण तोडकर, कृषी निष्ठ शेतकरी मोहन दुधाळ, शहाजी ननवरे, आबासाहेब दुधाळ, सुंदर बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा