महात्मा गांधी विद्यालयाच्या 950 विद्यार्थ्यांनी काढली शोभायात्रा

काले : रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त काढण्यात आलेली शोभायात्रा.

चित्ररथ व वेशभूषेतून दिला सामाजिक संदेश

कराड, दि. 5 (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त काले ता. कराड येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या वतीने शुक्रवारी सकाळी गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यात विद्यालयाच्या 950 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. चित्ररथ व विविध वेषभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. शोभायात्रा पाहून काले ग्रामस्थ थक्क झाले होते.
काले गाव रयत शिक्षण संस्थेची माऊली आहे. येथे कर्मवीर आण्णांचु संस्थेची स्थापना केली. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शताब्दी महोत्सवाच्या पूर्वसंध्येला रयत ज्योत प्रज्वलनाने या महात्सवोचा शुभारंभ करण्यात आला.
शुक्रवारी गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यात महात्मा गांधी विद्यालयाचे 950 विद्यार्थी विविध वेषभूषेत सहभागी झाले होते. अनेक विद्यार्थ्यांनी फेटे परिधान केले होते. तसेच काहींनी जिजामाता, छ. शिवाजी महाराज, खंडोबा- म्हाळसा तसेच कर्मवीर आण्णांची प्रतिकृती असणारा चित्ररथाचा समावेश करण्यात आला होता. या चित्ररथांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या शोभायात्रेत सरपंच, उपसरंपच यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान रविवार दि. 7 रोजी आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)