महात्मा गांधी जयंती निमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम

सातारा – महात्मा गांधीं यांच्या 150व्या जयंतीनिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संयोजन नगरपालिका व परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळी 9 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार घालून सद्‌भावना फेरीस सुरुवात होईल. फेरीमध्ये विद्यार्थी, नागरिक, पुरोगामी पक्षसंघटना आणि सातारा नगरपालिका सहभागी होणार आहेत. नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत फेरीचा शुभारंभ होणार आहे.

-Ads-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून फेरी निघणार असून कमानी हौद, गुरुवार पेठ-शेटे चौक मार्गे मोती चौकातून म. गांधी मैदान असा मार्ग राहणार आहे. यानंतर म.गांधी मैदानात गांधीजींच्या विचारांच्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.

दुपारी 4 पासून म. गांधी मैदानावर म. गांधी विचार यात्रा भरणार असून येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गांधीजींच्या विचारांचे पोस्टर्स प्रदर्शन, खादी आणि ग्रामोद्योगाच्या वस्तूंचे प्रदर्शन, गांधीजींविषयीच्या डॉक्‍युमेंट्रीज आणि शांती व सद्भावनेचा जागर करणाऱ्या गाण्यांचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)