महात्मा गांधी जयंती अरविंद एज्युकेशन सोसायटीत विविध उपक्रमांनी साजरी

सांगवीजुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिट्‌ल फ्लॉवर इंग्लिश व मराठी मिडीयम स्कूल, भारतीय विद्या निकेतनमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान, प्रतिमा पूजन, विद्यार्थी व शिक्षकांचे भाषण अशा उपक्रमांचे आयोजन केले होते. सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, भटू शिंदे यावेळी उपस्थित होते. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास परिश्रम घेतले. गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून परिसराची स्वच्छता करण्यात आली. महात्मा गांधी यांची तीन शहाणी माकडे विद्यार्थ्यांनी यावेळी साकारली. गांधीजींची तीन माकडे ही समाज परिवर्तन आणि नैतिक अधिष्ठानावर मानवी विकास घडवणारी होती, असा संदेश या माध्यमातून दिल्याचे अध्यक्षा आरती राव यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी “साबरमती के संत तुने कर दिया कमाल’ हे गीत यावेळी गायले. महात्मा गांधी यांच्या जीवनातील विचारही भाषणातून शिक्षिका कविता मुदलीयार यांनी व्यक्‍त केले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. महात्मा गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)