महात्मा गांधींवर गौतम बुद्धाचा प्रभाव : डॉ. अशोक चौसाळकर

सातारा – म. गांधींवर गौतम बुद्धाच्या विचाराचा खोल प्रभाव होता. ते स्वतः धर्म निष्ठ असले तरी धर्मनिरपेक्ष राज्याचे पुरस्कर्ते होते. भारत हिंदू राष्ट्र करण्यास तसेच गोहत्या बंदी कायदा करण्यास त्यांचा तीव्र विरोध होता, असे मत प्रसिद्ध राजकीय विश्‍लेषक, जेष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले.

येथील संबोधी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत ‘म. गांधींची धर्म कल्पना ‘ या विषयावर डॉ. चौसाळकर बोलत होते. विचार मंचावर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कार्यवाह ऍड. हौसेराव धुमाळ होते.
डॉ. चौसाळकर म्हणाले, म. गांधीचा सनातन धर्म हा नित्यनूतन धर्म होता.संत तुकाराम यांच्या प्रमाणे वेद, स्मृती पुराणातील सर्वच ग्रंथांचा अर्थ भाष्यकारांच्या पलीकडे जाऊन लावण्याचा अधिकार लोकांना असला पाहिजे या भूमिकेतून धर्म चिकित्सेचा आग्रह धरुन परंपरा आणि साहित्याबाबतचा द्रुष्टीकोन जोपासला. धर्माच्या आधारावर समाजात भेदभाव, द्वेष निर्माण करणे व राजकारणासाठी त्याचा वापर करता कामा नये. देव धर्म मानने नमानण्याचे स्वातंत्र्य लोकांना असले पाहिजे. लोकांनी निर्भय बनावे, त्यांचे नैतिक उन्नयन व्हावे, चांगल्या लोकांनी राजकारणात आले पाहिजे. यासाठी ते आग्रही होते.

-Ads-

म. गांधींवर रायचंद्र भाई जैन, विचारवंत टॉंलस्टॉंय, रस्किन यांच्या बरोबरच गौतम बुद्धाच्या विचाराचा खोल प्रभाव होता. धर्म चिकित्सा, बुद्धीप्रामाण्य, नैतिकता, सत्य, अहिंसा हे त्यांच्या धर्माचे उद्दिष्ट होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे यांनी स्वागत केले. ऍड. हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले.जेष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांच्यासह अनेक मान्यवर तसेच श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)