महात्मा गांधींची हत्या केली ती गोडसे प्रवृत्ती देशात रुजता कामा नये- अजित पवार

सोलापुर: ज्या प्रवृत्तीने महात्मा गांधींची हत्या केली ती गोडसे प्रवृत्ती देशात रुजता कामा नये. असे अजित पवार यांनी बजावले. राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तनयात्रा सोलापुर जिल्हातील अकलुज येथे दाखल झाली. दरम्यान, पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले, आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. त्यांना मी अभिवादन करतो. पण आज मी एक व्हिडिओ पाहिला. काही जातीयवादी लोक महात्मा गांधींचा फोटो समोर ठेवून त्याला गोळ्या घालत आहेत आणि तो व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. या भाजपा सरकारच्या काळात महात्मा गांधींचा अपमान केला जातोय आणि हे सरकार गप्प बसतंय. ज्या प्रवृत्तीने महात्मा गांधींची हत्या केली ती गोडसे प्रवृत्ती देशात रुजता कामा नये.

-Ads-

भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी आहे, आज या अकलूज विभागात कोणालाच कर्जमाफी मिळाली नाही. आमचं सरकार असताना आम्ही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. राज्य सरकारमध्ये आज दोन लाख जागा रिक्त आहेत. गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, आरोग्य, शिक्षण अशा अनेक विभागात अनेक जागा रिक्त आहेत. आपल्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अनेक जागा रिक्त असल्याचे पवार म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)