“महाडीबीटी’वरील शुल्कात बदल होणार नाही

उच्च व तंत्र शिक्षण विभागाची स्पष्टीकरण : मुख्य सचिवांचे आदेश जारी

पुणे – राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शुल्क निश्‍चित करण्यासाठी शुल्क नियामक प्राधिकरण अस्तित्वात आल्यानंतर प्राधिकरणाने मान्य केलेले शुल्क, त्या शैक्षणिक वर्षात संस्थेत प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत लागू राहील. संबंधित संस्थेतील अशा विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत तेच शुल्क लागू राहणार आहे. त्यामुळे “महाडीबीटी’वरील नोंदवलेल्या शुल्कात बदल करता येणार नसल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“महाडीबीटी’वरील शिष्यवृत्ती योजनेसंबंधी मुख्य सचिवांनी घेतलेले आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केले आहेत. महाराष्ट्र विनाअनुदानित, खाजगी व्यवसायिक संस्था प्रवेश-शुल्क अधिनियम 2015 नुसार राज्यात शुल्क नियमन प्राधिकरण अस्तित्वात आले. त्यानंतर प्राधिकरणाने मान्य केलेले शुल्क आकारणे बंधनकारक करण्यात आले. राज्यातील अनेक संस्थांनी शिक्षण शुल्क समितीच्या निर्देशाप्रमाणे शैक्षणिक तसेच विकासात्मक यामध्ये वाढ घेतलेली नाही. महाडीबीटी पोर्टलमध्ये संस्थांनी भरलेल्या शुल्काची पडताळणी करतात ही बाब निदर्शनास आली आहे. अनेक संस्थांनी पोर्टलवर भरलेले शुल्क कमी अथवा चुकीची असल्याचे सांगत, ते प्राधिकरणाने मागे घ्यावे अथवा नामंजूर करावी, अशी मागणी केलेली होती.

सद्यस्थितीत 2018-19 वर्षातील शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जाची छाननी संस्थांकडून सुरू आहे. त्यांना लाभ देण्याची कार्यवाहीदेखील विभागाने केली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत संस्थेने तरी पूर्वीच्या शिक्षण शुल्क समितीने मंजूर केल्याप्रमाणे 2016-17 टक्के वाढ विचारात घेऊन, महाडीबीटी पोर्टलवर शिक्षण शुल्क भरले नसल्यास त्यामध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अशा संस्थांनी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून किती शुल्क घेतले, हे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक यांच्याकडून तपासून घ्यावे. त्याप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर बदल करण्याची संधी दिली जाणार असून तंत्रशिक्षण संचालक आणि शुल्क नेमक प्राधिकरण त्याची पुढील कार्यवाही करणार आहेत, असेही राज्य शासनाने नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)