नवी दिल्ली: भारताचा आर्थिक विकासाचा दर 2018 -19 या आर्थिक वर्षांत 7.5 टक्के राहणार असल्याचा अंदाज आहे. तेलाच्या वाढत्या किमती या अर्थव्यवस्थेला आव्हान नेण्याची शक्‍यता आहे. परंतु यातून बाहेर पडण्याची ताकद भारताकडे असल्याचे मुडीजच्या 2018-19 अहवालातून मांडण्यात आली आहे. मागील काही महिन्यापासून विजेच्या किमतीत वाढ झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भाग व औद्योगिक क्षेत्र यामध्ये सुधारणा दिसून आली आहे.

जी 20 मध्ये समावेश असणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेत मजबूत स्थिती तयार झाली असून 2018 मध्ये दिसून येणारी अर्थव्यवस्थेमधील विकासदर वाढीचा दर वेगवेगळा राहणार असल्याचे संकेत मांडण्यात आले आहेत. जी 20 सारख्या परिषदा आणि दुसरीकडे अमेरिकेकडून वाढता व्यापार संरक्षण आणि तेलाच्या वाढत्या किमती यामुळे विकसनशील अर्थव्यवस्थेची स्थिती थोडी कमजोर राहिली असल्याचे सांगण्यात आले आहे. 2018 मध्ये जी 20 देशांचा आर्थिक विकासदर 3.3 टक्‍के आणि 2019 मध्ये 3.1 टक्‍के राहणार असल्याचा अंदाज आहे. तर 2018-19 मध्ये 5.1 आर्थिक विकासदर होण्याची शक्‍यता आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 7.5 टक्के राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)