महागाई वाढण्याची शक्‍यता 

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे महागाईचे चटके सहन करावे लागण्याची शक्‍यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार केंद्र सरकार नैसर्गिक गॅसच्या दरांमध्ये 14 टक्‍क्‍यांहून अधिक वाढ करण्याची शक्‍यता आहे. यामुळे सीएनजीच्या दरांमध्येही वाढ होईल. तसेच वीज आणि युरियाच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होणार आहे.
सध्या नैसर्गिक गॅसचा घरगुती उत्पादकांना प्रति युनिट 3.06 डॉलर मिळतात. ऑक्‍टोबरमध्ये यात 14 टक्‍क्‍यांची वाढ झाल्यास 3.5 डॉलरवर जाणार आहे. गॅस उत्पादकांना मिळणाऱ्या नैसर्गिक गॅसच्या दराचा सहा महिन्यांनी आढावा घेतला जातो. तसेच नवे दर अमेरिका, रशिया आणि कॅनडामधील किंमतीवर ठरविला जातो. यानुसार वाढलेल्या दरांची घोषणा 28 सप्टेंबरला होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भारत आपल्या गरजेच्या 50 टक्के गॅस आयात करतो जी घरगुती गॅसच्या किंमतीच्या दुप्पट किंमतीला पडते. घरगुती गॅसचे नवे दर 1 ऑक्‍टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू होणार आहेत आणि हे दर 2016 मधील दरांनंतर सर्वात जास्त असणार आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)