महागाई वाढण्याची शक्‍यता!!

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे येत्या ऑक्‍टोबरमध्ये महागाईचे चटकेही सहन करावे लागण्याची शक्‍यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार केंद्र सरकार नैसर्गिक वायूच्या दरांमध्ये 14 टक्‍क्‍यांहून अधिक वाढ होण्याची शक्‍यता आहे. यामुळे सीएनजीच्या दरांमध्येही वाढ होईल. तसेच वीज आणि युरियाच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होणार आहे. सध्या नैसर्गिक गॅसचा घरगुती उत्पादकांना प्रति युनिट 3.06 डॉलर मिळतात. ऑक्‍टोबरमध्ये यात 14 टक्‍क्‍यांची वाढ झाल्यास 3.5 डॉलरवर जाणार आहे. गॅस उत्पादकांना मिळणाऱ्या नैसर्गिक गॅसच्या दराचा सहा महिन्यांनी आढावा घेतला जातो. तसेच नवे दर अमेरिका, रशिया आणि कॅनडामधील किमतीवर ठरविला जातो. यानुसार वाढलेल्या दरांची घोषणा 28 सप्टेंबरला होणार आहे.

भारत आपल्या गरजेच्या 50 टक्‍के गॅस आयात करतो जी घरगुती गॅसच्या किमतीच्या दुप्पट किमतीला पडते. घरगुती गॅसचे नवे दर 1 ऑक्‍टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू होणार आहेत. आणि हे दर ऑक्‍टोबर, 2015 ते मार्च, 2016 मधील दरानंतर सर्वात जास्त असणार आहेत. या काळात गॅसच्या प्रति युनिटला 3.82 डॉलरचा दर होता. नैसर्गिक गॅसच्या किमती वाढल्याने त्याचा थेट फायदा सरकारी कंपनी ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला होणार आहे. यामुळे सीएनजीच्या किमतीही वाढणार आहेत. त्याचबरोबर या काळात सर्वसाधारण महागाईतही वाढ होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)