महागाई भत्त्यासाठी सरकारी कर्मचा-यांचा संघर्ष

जयंत पाटील यांची टिका : सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष
मुंबई – राज्यातील सरकारी कर्मचा-यांना महागाई भत्ता देतानाही सरकार आढेवढे घेत आहे. महागाई भत्त्यासाठी सरकारी कर्मचा-यांना आज संघर्ष करावा लागत आहे. आंदोलन सुरू असतानाही सरकारने कर्मचा-यांकडे अक्षम्य दुर्लक्ष चालवले आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

सातवा वेतन आयोग, थकीत महागाई भत्ता तसेच अन्य मागण्यांसाठी राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संपावर उतरले आहेत. सरकारी कर्मचा-यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस होता. यापार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी कर्मचा-यांना दिलेल्या आश्वासनावरून सरकारवर टीका केली.

-Ads-

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या तयारीचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी सातवा वेतन आयोगाची रक्कम देण्याची घोषणा केली आहे. परंतु, आधी फरक दिला पाहिजे आणि नंतर मुख्य रक्कम द्यायला हवी. परंतु, राज्य सरकारने कर्मचा-यांना जो शब्द दिला आहे याचा अर्थ कर्मचा-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास सरकारने बराच उशीर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू करू असे जाहीर केले आहे. याचा अर्थ राज्यातील कर्मचा-यांचे पैसे देण्याची सरकारची इच्छा नाही. बहुधा एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणूक होणार असल्याने त्या निवडणुकीवेळी आम्ही तुम्हाला दिले हे सांगण्यासाठी सरकारने जानेवारी 2019चा शब्द दिल्याची टीका पाटील यांनी केली.

महाराष्ट्रात ठेकेदारी पध्दत…
सरकारने आता नवीन फतवा काढला आहे. कर्मचा-यांच्या संदर्भात नवीन योजना तुम्हाला घ्यायची असेल तर 25 टक्के कर्मचारी कमी करण्याची तजवीज करून तुम्ही योजना सादर करा, असे सांगण्यात आले आहे. याचा अर्थ महाराष्ट्रात ठेकेदारी पध्दत राबवून सरकारला काम करून घ्यायचे आहे. हे नवे धोरण म्हणजे स्वस्तातील कर्मचारी राबवून ठेकेदारी पध्दतीला प्रोत्साहन देण्याची सरकारची योजना आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)