महागाई कमी पातळीवर ठेवण्यात यश

तूट मर्यादित आणि विकासदर समाधानकारक

नवी दिल्ली – महागाई कमी पातळीवर ठेवण्यात सरकारला यश आले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात एक वेळ महागाईचा दर 3.3 टक्‍के इतका कमी झाला होता. सहा वर्षातील हा नीचांक असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर 2014-15 ते 2017-18 या काळात भारताचा विकासदर 7.3 टक्‍के इतका राहिला आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा तो जास्त आहे. किमती कमी पातळीवर ठेवून विकासदर जास्त ठेवण्यात सरकारला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर या काळात सरकारने ठरविल्याप्रमाणे तूट कमी ठेवण्यात आली आहे. या वर्षातही तूट 3.2 टक्‍क्‍याच्या आत ठेवण्याचे प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सूचित केले. त्यांनी सांगितले की सध्या काही प्रमाणात महागाई वाढली आहे. मात्र, ती केवळ काही राज्यांत आणि फळे आणि भाजीपाला महागल्यामुळे वाढली आहे. कालांतराने भाज्या आणि फळे स्वस्त होतात आणि ही महागाई कमी होते, असे त्यांनी सांगितले.

-Ads-

गेल्या तीन वर्षांत झालेली सर्वात मोठी आर्थिक सुधारणा म्हणजे एकत्रित वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी होय. यामुळे केवळ देशातील उद्योगांनाच नाही तर परदेशातील उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. व्यापारी आणि मोठ्या कंपन्यांसह सर्वसामान्य लोकांनीही या घडामोडीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले आहे त्यामुळे ही पूर्णत: नवीन असलेली करप्रणाली केवळ काही महिन्यातच देशाच्या कानाकोपऱ्यात रूळली असल्याचे वातावरण आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)