महागाईने भाकरी करपणार!

पेरणीचे क्षेत्र घटले, उत्पादनही कमी होणार

पुणे – दुष्काळामुळे राज्यात यंदा सर्वांत जास्त तडाखा रब्बीच्या ज्वारीला बसला आहे. जलाशयांमध्ये अत्यल्प पाणी आणि जमिनीत ओलावा नसल्याने ज्वारीच्या फक्त 42 टक्‍के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण 67 टक्‍यांपर्यत पोहचले होते. त्यामुळे उत्पादन कमी होऊन पर्यायाने ज्वारीचे भाव गगनाला भिडण्याची भीती आहे.

राज्यात सरासरी 26 लाख 79 हजार 728 हेक्‍टरवर ज्वारीच्या पेरण्या केला जातात. यंदा मात्र, आतापर्यंत अवघ्या 11 लाख 34 हेक्‍टरवर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या हंगामात याच कालावधीत 17 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या.

ज्वारीच्या पेरण्यांमुळे जनावरांना चारा सुद्धा उपलब्ध होतो. सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप सुरू असल्यामुळे चाऱ्यासाठी एकदम गंभीर स्थिती राज्यात तयार झालेली नाही. मात्र, गाळप संपताच ही स्थिती बिकट होणार आहे. त्यातच यंदा पेरण्या घटल्याने, तसेच कारखान्यांचे गाळपदेखील लवकर संपणार असल्याने चाऱ्याची समस्या काही भागांत उग्र राहण्याची शक्‍यता आहे.

कृषी आयुक्तालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, “राज्यातील ज्वारीच्या उत्पादनात कधी नव्हे ती इतकी घट येण्याची शक्‍यता आहे. ज्वारीची सध्याची स्थिती पाहता आता रब्बी हंगामात पुढील कालावधीत केवळ गहू व हरभऱ्याचा पेरण्या होत राहतील. ऊस काढून गहू पेरण्याकडे काही भागात कल असतो. तथापि, यंदा धरणांच्या लाभक्षेत्रात कालवे कशा पद्धतीने चालतात, यावर गव्हाचे भवितव्य अवलंबून राहील.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)