महागाईने त्रस्त एलपीजी ग्राहकांना परत हवी सोडलेली सबसिडी 

रायपूर (छत्तीसगड): महागाईने त्रस्त एलपीजी ग्राहक आपणहून सोडलेली सबसिडी परत मागू लागले आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या गॅस कंपन्यांकडे ऑन लाईन अर्ज येण्यास सुरुवात झालेली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये सुमारे दीड ह्जार एलपीजी ग्राहकांनी गॅस सबसिडी पुन्हा मिळावी यासाठी अर्ज केल्याचे सांगण्यात आले आहे. रायपूरमध्ये सध्या एलपीजी सिलिंडरची किंमत 1019 रुपये झालेली आहे. आणि आगामी काळात ती आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

गॅस सबसिडी सोडलेल्या ग्राहकांना जर पुन्हा सबसिडी हवी असेल, तर त्यांनी फक्त एक अर्ज द्यावा. पुढील डिलिव्हरीच्या वेळी सबसिडी मिळणे सुरू होईल. मात्र त्यांचे उत्पन्न दहा लाखांपेक्षा कमी असणे आवश्‍यक आहे.
दुसरीकडे एलपीजीच्या ऑनलाईन बुकिंगबाबत ग्राहकांच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. बुकिंग होऊनही बुकिंग न झाल्याचे एजन्स्या सांगत आहेत. आणि एलपीजी सिलिंड्‍रची होम डिलिव्हरी होण्यार 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)