महागाईच्या शक्‍यतेमुळे व्याजदर वाढीची चर्चा

कडक पतधोरणाची शक्‍यता; क्रूड व वाढणाऱ्या तुटीचा होणार परिणाम

मुंबई – गेल्या काही महिन्यापासून रिझर्व्ह बॅंकेचा रेपोदर 6 टक्‍के या पातळीवर कायम आहे. तरीही कंपन्यांकडून होत असलेली गुंतवणूक वाढत नसल्यामुळे तो कमी करण्याची गरज उद्योजकांच्या संघटना व्यक्त करीत असतानाच रेपोदर वाढविण्याची शक्‍यता खुली ठेवण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीच्या सदस्यांनी सांगीतले आहे. त्यामुळे आता रिझर्व्ह बॅंक व्याजदरात कपात तर करणार नाहीच उलट त्यात वाढ करण्याची शक्‍यता वाढली असल्याचे विश्‍लेषक मानू लागले आहेत.

-Ads-

पाऊस जरी चांगला पडला तरी क्रुडचे दर महागाई कमी करण्यात अडथळे निर्माण करू शकतात. क्रूड महाग होत असल्यामुळे इंधनाचे दर भारतात 55 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत. त्याचबरोबर चालू खात्यावरील तूट वाढत असल्यामुळे रुपया घसरत आहे. या कारणामुळे महगाईत भर पडण्याची शक्‍यता आहे. जर महागाई ठरविलेल्या पातळीपेक्षावर गेली तर रेपोदरात वाढ करण्याशिवाय बॅंकेला पर्याय राहणार नसल्याचे इक्रा या संस्थेने म्हटले आहे.
जपानच्या नोमुरा या संस्थेने यावर्षी व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता कमी असल्याचे सांगितले आहे तर अमेरिकेच्या मॉर्गन स्टॅन्लीने म्हटले आहे की, डेप्युटी गव्हर्नर विराल आचार्य यांनी बैठकीत बोलताना स्थूल अर्थव्यवस्था मजबुत ठेवण्यासाठी व्याजदर वाढीच्या शक्‍यतेवर विचार करण्याची गरज असल्याचे सांगीतले आहे. महागाई 6 टक्‍क्‍याच्या वर गेल्यास रिझर्व्ह बॅंक ती कमी करण्यासाठी सक्रीय होण्याची शक्‍यता आहे.

मात्र बॅंक ऑफ अमेरिकेने सांगीतले आहे, की जर या वर्षी पाऊस चांगला पडला तर व्याजदरात कपात होण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण होऊ शकते. या महिन्याच्या सुरुवातीला बॅंकेच्या पतधोरण समितीने व्याजदर पुन्हा जैसे थे ठेवले होते. समितीच्या पाच सदस्यांनी व्याजदर जैसे थे ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले होते. तर एका सदस्याने व्याजदरात पाव टक्‍के वाढ करण्याची गरज असल्याचे सांगितले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)