महागले बसभाडे, कारने गावी जा…

पिंपरी – दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या लोकांचा गैरफायदा घेत खासगी बस ऑपरेटर्स भाडे कित्येक पटीने वाढवतात. रेल्वे, एसटी रिझर्व्हेशन खूप पूर्वीच बुक झाले आहेत. रेल्वे, एसटीने अतिरिक्‍त बसेस सोडून ही प्रवाशांच्या संख्येचे तुलनेत जादा गाड्या अपुऱ्या पडत आहेत. याचाच फायदा घेत खासगी बस चालकांनी बस भाडे हजारो रुपयांच्या घरात नेऊन ठेवले आहेत. खासगी बसचे भाडे पाहून कित्येक मध्यमवर्गियांना गावी जाण्याचे नियोजन रद्द करावे लागते, असे दरवर्षी घडते. परंतु यंदा नागरिकांनी इंटरनेट आणि वेगवेगळ्या ऍपच्या माध्यमातून स्वस्त आणि सोपा तोडगा काढला आहे. ज्यांच्याकडे कार आहेत ते शेयरिंगच्या माध्यमातून नागरिकांना गावापर्यंत घेऊन जात आहेत. यामुळे कारमालकाला एकट्याला सगळा इंधन खर्च करावा लागत नाही तर नागरिकांनी स्वस्तात कारने गावापर्यंत जाता येते.

पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर असल्याने देशाच्या काना-कोपऱ्यांतून नागरीक येथे नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी आले आहेत. दिवाळीच्या काळात दरवर्षी सर्व मार्गांवरील खासगी बसचे भाडे हजारों रुपयांमध्ये जाते. अजून दिवाळीला पंधरा दिवस बाकी असतानाच कित्येक मार्गांवरील बस भाडे तीन ते चार पटीने वाढले आहे. दिवाळी जशी जशी जवळ येत जाईल तसे-तसे हे भाडे वाढतच जाणार हे निश्‍चित. ऑनलाईनवर एक, दोन आणि तीन नोव्हेंबरसाठीचे बसभाडे अतिशय महाग झाले आहे. काही शहरांसाठी बसभाडे दरवर्षी तीन ते चार हजार रुपयांपर्यंत पोहचते.
सरकारने एसटी बसच्या दीडपट भाडे घेण्याची मुभा खासगी बसचालकांना देण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक भाडे घेऊ नये, असा सरकारचा नियम असताना देखील दरवर्षी हे नियम धाब्यावर बसवून कित्येक पट वाढवून ठेवले जाते. अतिरिक्‍त पैसे मोजूनही नागरिकांना बसचालक बसमध्ये बसवेल त्या सीटमध्ये तर कित्येक चालकाच्या केबिनमध्ये बसून लांबचा प्रवास करावा लागतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आली नवी संकल्पना
गेल्या कित्येक वर्षांपासून खासगी बस मालकांची लूट सहन करत असलेल्या नागरिकांना कार शेयरिंग संकल्पना खूपच आवडली आहे. ज्यांच्याकडे कार आहे असे नागरीक आपल्याला ज्या गावी किंवा शहरात जायचे आहे, त्याचे नाव ऍपवर किंवा इंटरनेटच्या साईट्‌सवर टाकून आपल्याला अपेक्षित असलेले भाडे लिहितात. हे भाडे खासगी बसच्या तुलनेत खूपच थोडे असते. अत्यल्प भाड्यात आपल्या मूळगावी कारने जाण्याची नागरिकांना संधी मिळते. इंटरनेटवर कार शेयरिंग तपासल्यास दहाहून अधिक साईट्‌स या सुविधा देणाऱ्या सापडतात. बहुतेक सर्वच शहर आणि गावी जाणारी वाहने देखील उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये लोकप्रिय
ही संकल्पना आयटीनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली आहे. कोणत्याही शहराचे नाव टाकल्यास त्या ठिकाणी जाणारे कित्येक पर्याय समोर दिसून येतात. विशेषत ब्लाब्ला, मेरु, ओराही, एसराईड या साईट्‌स आणि ऍपचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होताना दिसत आहे. आपण जाणार असलेल्या दिवस, वेळ, स्थान व कार मालकाला अपेक्षित असलेले भाडे या सर्व बाबींचा यात उल्लेख असतो. तसेच कार मालकाचे नाव आणि फोटो देखील पहायला मिळतो.

दरांमधील तफावत
एकीकड खासगी बस हजारो रुपये भाडे घेत असताना या ऍपच्या माध्यमातून खूप कमी भाड्यात कारने जाण्याची संधी मिळत आहे. बुधवारी या ऍपवर चेक केले असता. पिंपरी-चिंचवड येथून कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, नाशिक, मनमाड, येवले, मालेगाव एवढेच नव्हे तर परराज्यासाठी देखील शेयरिंग कार उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापुरसाठी 300 ते 600 रुपये, सोलापूरसाठी 400 ते 650 रुपये, नागपूरसाठी 1600 ते 2000 रुपये, सुरतसाठी 900 ते 1000 रुपये, धुळेसाठी 700 ते 1000 रुपये, मालेगाव 580 ते 1000, शिक्रापूर, नंदूरबार, सेंधवासाठी 700 ते 1000 रुपये भाडे कारमालकांकडून आकारले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)