महागणपती पुलावर वाढताहेत अतिक्रमणे

वाई – वाई शहरातील महागणपती पुलावरील अतिक्रमणे नागरिकांसह वाई येणाऱ्या पर्यटकांसाठी नवीन नाहीत. परंतु, गत काही महिन्यांपासून या पुलावरील अतिक्रमाणांमध्ये वाढ झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजुला व्यावसायिकांनी आपली दुकाने रस्त्यावरच थाटली आहेत. त्यामुळे पुल वाहतुकीसाठी अरुंद झाला आहे. विशेषत: याठिकाणी किरकोळ अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत.

वाई शहरात असलेल्या महागणपतीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. मात्र, मंदिरापर्यंत जाण्यासाठी या भाविकांना मोठी कसरत करावी लागते. विशेषत: संकष्टी चतुर्थीदिवशी वाईत भाविकांचा जणूकाही मेळाच भरत असतो. यावेळी पुलावरील अतिक्रमणांचा भाविकांना मोठा अडथळा सहन करावा लागतो. त्यातच शहरातील नागरिकांचीही या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

शहरात असणारी विद्यालये, महाविद्यालये यामुळे विद्यार्थ्यांचीही या रस्त्यावर गर्दी होते. अनेकदा या गर्दीतूनच दुचाकीस्वार धुमस्टाईल वाहने चालवत असतात. याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे पालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई करुन ही अतिक्रमणे काढावीत आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करुन देण्याची मागणी होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)