महागणपतीला 501 शहाळ्यांची आरास

रांजणगाव गणपती-अष्टविनायकातील महागणपती मंदिरात पुष्पपती विनायक जयंती निमित्त 501 शहाळ्यांची आरास करण्यात आली होती.
याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष डॉ. संतोष दुंडे, उपाध्यक्ष ऍड. विजयराज दरेकर, सचिव प्रा. नारायण पाचुंदकर, दत्तात्रय पाचुंदकर, माजी पोलीस पाटील रत्नाकर पाचुंदकर, माजी विश्वस्त मकरंद देव, पुजारी प्रसाद कुलकर्णी, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, बाळासाहेब संदिपस्त आदी उपस्थित होते. रांजणगाव येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक आनंदराव पाचुंदकर यांच्या वतीने रविवारी (दि. 29) दुपारी महापुजेच्या प्रंसगी शहाळ्यांची आरास महागणपतीस लावण्यात आली. दरम्यान रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास गणेश प्रताप ग्रंथ पारायण सोहळ्याची सुरवात स्वानंद पुंड यांच्या हस्ते करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)