महागणपतीच्या मुक्‍तद्वार दर्शनाची उद्यापासून पर्वणी

रांजणगाव गणपती-अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र रांजणगाव येथील भाद्रपद गणेशोत्सवानिमित्त सोमवारपासून (दि. 10) भाविकांना महागणपतीच्या मुक्तद्वार दर्शनाची सुवर्ण-पर्वणी मिळणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष डॉं. संतोष दुंडे यांनी दिली.
भाद्रपद यात्रा महोत्सव हा 10 सप्टेबर ते 16 सप्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. प्रथेनुसार भाद्रपद गणेशोत्सवात श्री महागणपतीच्या चारा ही दिशांना असलेल्या बहिणींना आणण्यासाठी पालखीद्वारे द्वारयात्रा काढली जाणार असल्याचे सचिव प्रा. नारायण पाचुंदकर यांनी सांगितले. यात्रा काळात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन भाविकांना विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये सावलीसाठी मंडप व्यवस्था, वाहनतळ, पिण्यासाठी मुबलक पाणी, हिरकणी कक्ष आदी सुविधा देण्यात आल्या असल्याचे खजिनदार शेखर देव यांनी सांगितले. यात्रा काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये सोमवारपासून ते गुरुवारपर्यंत पहाटेपासून सायंकाळपर्यंत भाविकांना श्री महागणपतीच्या मुर्तीला प्रत्यक्ष हाताने स्पर्श करुन दर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळणार असल्याचे उपाध्यक्ष अँड. विजयराज दरेकर यांनी सांगितले. तहसीलदार रणजित भोसले यांनी ग्रामस्थ व विश्वस्तमंडळ यांच्या समवेत बैठक घेऊन भाविंकासाठी आवश्‍यक त्या सुविधा व नियोजनाचा आढावा घेतला. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सुरक्षे संदर्भातल्या आवश्‍यक सूचना देऊन मंदिर परिसराची पाहणी केली. या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष डॉ. संतोष दुंडे, सचिव प्रा. नारायण पाचुंदकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलीस कर्मचारी किशोर तेलंग, कुंभार, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)