महागड्या दुचाक्‍या चोरणाऱ्या तिघांना अटक

गुन्हे शाख युनिट एकची कारवाई


साडेचार लाखाच्या तीन गाड्या जप्त

पुणे – नंबर प्लेट न लावता दुचाकी वापरणाऱ्या संशयित युवकांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे तपास करून वाहन चोरीचे तीन गुन्हे आणले आहेत. चोरलेल्या साडेचार लाख रूपयांच्या तीन महागड्या दुचाक्‍या जप्त केल्या आहेत.

ऋषीकेश संजय मुळीक (रा.अनपटवाडी , ता.कोरेगाव, जि. सातारा), शुभम सनिल बोडरे (रा. आदर्की , ता. फलटण, जि.सातारा) आणि सुमीत नाना भंडलकर (रा. राजापूर, ता. भोर, जि.पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
शहरात दुचाकी चोरीचे गुन्हे वाढत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर गुन्हे शाखा युनिट एकचे पथक तपास करीत होते. दरम्यान, मंगळवार पेठेतील जुना बाजार येथे काही युवक पल्सर कंपनीच्या लाल, निळ्या रंगाच्या नंबरप्लेट नसलेल्या दुचाक्‍या घेऊन उभे आहेत अशी माहिती पथकातील कर्मचारी सचिन जाधव याना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेत तीन युवकांना ताब्यात घेतले. तीघांकडे चौकशी केली असता त्यांनी सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना ताब्यात घेत पोलिसी खाक्‍या दाखविताच त्यांच्या जवळ असलेल्या दुचाक्‍या चोरल्याचे कबूूल केले. आरोपींनी सदर दुचाक्‍या फुरसुंगी, जेजुरी आणि वाई येथून चोरल्याची माहिती दिली. तीन्ही दुचाक्‍यांचे हॅंडल लॉक तोडून चोरल्याचे तपासातून उघडकीस आले आहे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)