महागठबंधन जातियवादी पक्षाचा धुव्वा उडवेल

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्‍वास

कराड – राज्यातील सहकारी संस्था कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याचा राग काढण्यासाठी भाजप मुद्दाम सुडाचे राजकारण करत आहे. सहकार चळवळ दुर्लक्षित ठेवून कॉंग्रेस विरोधात रोष वाढेल का? याची रणनिती भाजप आखत आहे. ऊसदराचा प्रश्न कसा चिघळेल, याचाही प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचे सुडाचे राजकारण फार दिवस चालणार नाही. कॉंग्रेस देशव्यापी पक्ष आहे. येत्या निवडणुकीत कॉंग्रेससह सर्व पक्षांचे महागठबंधन जातियवादी पक्षाचा धुव्वा उडवल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेठरे बुद्रुक व जुळेवाडी (ता. कराड) येथील संपर्क बैठकीमध्ये ते बोलत होते. जयवंतराव दमामे अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश मोहिते, जयवंतराव जगताप, इंद्रजित चव्हाण, एनएसयुआयचे राष्ट्रीय सचिव शिवराज मोरे, उत्तमराव मोहिते, मदनराव मोहिते, अमरसिंह मोहिते, कृष्णत चव्हाण-पाटील, अशोक सूर्यवंशी, आबा सूर्यवंशी, दिपक पाटील-शेरेकर, ऋतुराज मोरे, शशिकांत साळुंखे, अरविंद साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला केवळ 31 टक्के मते मिळाली. 69 टक्के मतांची विभागणी झाल्याने कमी मते मिळूनही भाजप विजयी झाले. पण आता देशातील सर्वच पक्ष एकत्र येत आहेत. नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुकात त्याचा परिणाम दिसला.

तीन राज्यातील भाजप सरकार पाडून जनतेने कॉंग्रेसला निवडून दिले. मोदीमित्र उद्योगपतींनी तीन लाख कोटींची कर्जे बुडवली आहेत. त्यांना अभय देण्यामध्ये केंद्रातील सरकार मग्न आहे. त्यांच्या कर्जाचा खड्डा भरण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सामान्यांच्या खिशावर या सरकारचे लक्ष आहे. मुंबई-गुजरात बुलेट ट्रेनऐवजी शेतकऱ्यांना सोयी पुरवणे गरजेचे होते. मोदींच्या करिष्म्यावर विसंबून राहिलेल्या राज्य सरकारनेही सर्वांची घोर निराशा केली आहे. येत्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची दुःखे माहिती असणाऱ्या कॉंग्रेसला जनता खंबीर साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आबा सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. बाळकृष्ण कार्वेकर, अशोक सूर्यवंशी, सनी मोहिते, अरविंद साळुंखे, शशिकांत साळुंखे यांनी स्वागत केले.

मदनदादा समर्थक कॉंग्रेसच्या संपर्कात

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या रेठरे बुद्रूकमधील बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बबनराव दमामे यांचे बंधू जयवंतराव दमामे होते. येत्या काही दिवसात श्री. दमामे यांचे कुटुंबीय आ. चव्हाण यांची जाहीर सभा घेणार असल्याची गावामध्ये चर्चा आहे. माजी सरपंच बबनराव दमामे हे मदनराव मोहिते यांचे निकटचे सहकारी आहेत. या राजकीय घडामोडीची परिसरात चर्चा सुरु आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)