पिंपरी – दोन पिस्तूल व सहा जिवंत काडतूसांसह महाकालीचा सदस्य साजन मन्नु मेहरा (वय- 25, रा. महात्मा गांधी शाळेजवळ, देहुरोड) याला निगडीतील ट्रान्सपोर्ट नगर मधून पोलिसांनी अटक केली. त्यामुळे टोळीचे सदस्य पुन्हा परिसरात डोके वर काढत असल्याचे दिसू लागले आहे.

पीएमपीएमएलच्या भिंतीजवळ एकजण संशयित थांबलेला आढळून आला. याबाबत माहिती मिळताच निगडी पोलिसांच्या तपास पथकाने सापळा रचून साजन याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल आणि त्यात चार जिवंत काडतुसे असा 45 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता आणखी एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आणि एक खाली मॅगझीन पोलिसांनी हस्तगत केले. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे असा एकूण 91 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तो महाकाली टोळीतील सदस्य असून त्याच्यावर देहुरोड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, अग्नीशस्त्र बाळगणे याबाबत चार गुन्हे दाखल आहेत.
महाकाली टोळीचा म्होरक्‍या रावण याचा खून केल्यानंतर ही टोळी शांत होती. या घटनेमुळे ही टोऴी पुन्हा सक्रीय झाली असून नवीन आयुक्‍त आर. के. पद्मनाभन्‌ त्यांच्यावर कसा वचक ठेवतील, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)