महाकपातीविरोधात कर्मचाऱ्यांकडून ‘असहकार’

मोबाईल सिमकार्ड प्रशासनाकडे जमा : ग्राहकांना मनस्ताप

पुणे – महावितरण प्रशासनाने पुनर्रचना करण्याच्या नावाखाली मेगाकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कामगार संघटनांनी विरोध करूनही प्रशासनाच्या मानसिकतेत कोणताही फरक पडलेला नाही. त्यामुळे कामगार संघटनांनी या निर्णयाच्या निषेधार्थ असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने दिलेले मोबाईल सिम कार्ड अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जमा केली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाढत्या खर्चामुळे आर्थिक भार वाढत असल्याचे महावितरण प्रशासनाकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक खर्च हा प्रशासकीय कामकाज आणि अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होत असल्याचा कांगावा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी पुनर्रचना करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे या पुनर्रचनेच्या नावाखाली राज्यभरातील सर्व परिमंडलात मेगाकपात करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात पुण्यासह ठाणे, भांडुप, वाशी आणि कल्याण शहरात करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाला आतापर्यंत विविध कामगार संघटनांनी आंदोलने, द्वारसभा, निषेधसभा या माध्यमातून विरोध करण्याचा प्रयत्न केला. तरीही प्रशासनाने त्यांच्या निर्णयात कोणताही बदल केलेला नाही.

प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात पाच कामगार संघटनांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या कृती समितीने 7 ते 9 जानेवारी दरम्यान 72 तासांचा संप पुकारला आहे. या संपाची तयारी सुरू असतानाच या कृती समितीतील जवळपास 80 टक्‍के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील मोबाईल सिमकार्ड प्रशासनाकडे जमा केली आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्‍न वीज ग्राहकांना पडला आहे.

कामगार संघटनांशी यापूर्वी चर्चा करण्यात आली आहे. त्याशिवाय येत्या 5 तारखेलाही चर्चा करण्यात येणार असून या बैठकीत प्रशासनाची बाजू त्यांना समजावून सांगण्यात येणार आहे.

– पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण


प्रशासनाचा हा निर्णय कामगारांसह ग्राहकांनाही घातक असाच आहे. या माध्यमातून प्रशासन अथवा ग्राहकांना वेठीस धरण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. याउलट ग्राहक आणि कामगारांचे हित जोपासले जावे, असेच आमचे म्हणणे आहे. त्यामुळे संघटनेच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही.

– ईश्‍वर वाबळे, झोनल सचिव, महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)