महाऑनलाइनद्वारे गावपातळीवर सर्व सेवा देणार

नेवासा फाटा – आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत महाऑनलाइन द्वारे गावपातळीवर सर्व सर्व देणार असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे यांनी सेवा केंद्र चालकांच्या एकदिवसीय कार्यशाळेत बोलतांना दिली.

पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मुंढे होते. आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा समन्वयक आव्हाड, जिल्हा हार्डवेअर इंजिनियर विजय पठारे, विस्तार अधिकारी पाखरे, इंगळे, तालुका समन्वयक असीफ सय्यद यावेळी उपस्थित होते. यावेळी मुंढे म्हणाले की आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत आपण गावपातळीवर महाऑनलाईनच्या सर्व सेवा उत्पन्नाच्या दाखल्यासह जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड सेवा उपलब्ध करून देणार आहोत. या सर्व सेवा ग्रामीण भागातील जनतेला मिळणार असल्याने त्यांच्या वेळ आणि पैशाची ही यामुळे बचत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)