“महाएक्‍स्पो’ची यशस्वी सांगता; कोट्यावधींची उलाढाल

या उत्सवात डॉग शो व व्हॉट्‌स-ऍप शोचे आयोजन करण्यात आले. डॉग शोमध्ये रॉट विलर, ग्रे हाऊंड, ग्रेट डेन, जर्मन शेफर्ड, पग, लॅब्रोडोर, सायबरीयन हस्की, पश्‍मी, पामोरियन, कारवान, बिगल, कॉकर्स पॅनियल जातींच्या श्‍वानांनी भाग घेतला. यातील पप्पी ग्रुपमध्ये विशाल एकतपुरे यांच्या “डॉबरमॅन’ला प्रथम,तर रुचा गुजर यांच्या “बिगल’ला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळले. ऍडल्ट ग्रुप मध्ये आनंद पावशे यांच्या “जर्मन शेफर्ड’ला प्रथम, तर शैलेश राचकर यांच्या “रॉट विलर’ला द्वितीय, इंडियन ग्रुप मधील ऍडल्ट ग्रुपमध्ये बिरूदेव घुले यांच्या “कारवान’ला प्रथम, तर पप्पी ग्रुपमध्ये बाबासाहेब गोडसे यांच्या “ग्रे हाऊंड’ला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.

 

सहकार महर्षींच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवशंकर बझार व अकलूज ग्रामपंचायतीचा उपक्रम

-Ads-

अकलूज – अकलूजबरोबरच माळशिरस तालुका परिसरात “महाएक्‍स्पो 2018′ ची यशस्वी सांगता मंगळवारी (दि. 30) सायंकाळी सुप्रसिध्द हास्य कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर आणि सुरेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या काव्य मैफलीने झाली. सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त येथील शिवशंकर बझार व अकलूज ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्षा स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील आणि सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दिवस राज्यभरातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जीवन चरित्राचे दर्शन देणाऱ्या छायाचित्रांचे दालन महाएक्‍स्पोचे प्रमुख आकर्षण ठरले.

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने या महाएक्‍स्पोचे उद्‌घाटन खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. या उद्‌घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते “लागीर झालं जी…’ या मालिकेतील कलाकार. यावेळी झालेल्या पैठणी शोच्या कार्यक्रमामध्ये सुमारे शंभरपेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. यामध्ये सायरा शेख या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर नेहा फडे, अर्चना खटके, हर्षाली बुनगे, प्रफुल्लता घुगे यांना उपस्थित कलाकारांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

या कार्यक्रमात “मिस सोलापूर’ आणि “मिस्टर सोलापूर’ या स्पर्धेमध्ये 40 युवती आणि 25 युवकांनी सहभाग नोंदविला. यात मिस सोलापूर होण्याचा मान अनुराधा गव्हाणे यांना, तर मिस्टर सोलापूरचा मान अक्षय शेळके यांना मिळाला. .
यावेळी झालेल्या सदृढ बालक स्पर्धेत सुमारे 50 बालकांची तज्ज्ञ डॉक्‍टरांमार्फत तपासणी करून सदृढ बालकांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक स्मीत काटकर, द्वितीय मोहिज बागवान, तृतीय इशिता फडे, चतुर्थ ध्रुवराज गुळवे, तर पाचवा क्रमांक कृषिराज साळुंखे यांना देण्यात आला. त्याच दिवशी झालेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये सुमारे शंभरहून अधिक स्पर्धकांनी विविध वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला.

मंगळवारी (दि. 30) सुप्रसिध्द कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर आणि सुरेश शिंदे यांच्या कवितांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अकलूजसह परिसरातील नावाजलेल्या कवींसह अनेक नवकवींनी सादर केलेल्या कवितांनाही प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. महाएक्‍स्पोमधील विविध कार्यक्रमांस खा.विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, राजसिंह मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, जि. प. मा. पक्षनेते धैर्यशील मोहिते-पाटील, जि. प. सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, उपसभापती किशोरसिंह सुळ-पाटील, व्हाईस चेअरमन अर्जुन भगत यांच्यसह शिवशंकर बझारचे सर्व संचालक, अकलूज ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवशंकर बझारचे सरव्यवस्थापक संभाजीराव पाटील व अकलूज ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी कदम यांच्यासह दोन्ही संस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)