महाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी

वाई : महाआरोग्य शिबिरादरम्यान मार्गदर्शन करताना खा. उदयनराजे भोसले व इतर मान्यवर.

खा. उदयनराजे भोसले : वाईत 3515 रूग्णांची तपासणी
महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, मिशन हॉस्पिटलचे उत्स्फूर्त नियोजन
वाई, दि. 23 (प्रतिनिधी) – सध्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मोठ-मोठे आजारा सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहेत. यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे आवश्‍यक आहे. यासाठी अशा प्रकारची आयोजित महाआरोग्य शिबिरे सामान्य लोकांसाठी संजीवनी ठरतील, असे उद्‌गार मिशन हॉस्पिटल वाई येथे आयोजित केंद्र सरकार राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग व खासदार उदयनराजे भोसले यांच्या विद्यमाने येथील मिशन हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिरात बोलताना खा. उदयनराजे भोसले यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ, शशिकांत पिसाळ, नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे युवक नेते विकास शिंदे, शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, विजयसिंह नायकवडी, जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरात तीन हजार 515 रूग्णांची तपासणी करण्यात आली. मिशन हॉस्पिटलचे उत्स्फूर्त नियोजन तज्ञ डॉक्‍टरांची तत्परता आणि रूग्णांच्या सहभागाने वाईतील महाआरोग्य शिबिर यशस्वी झाले. शिबिरात कॅन्सर, स्त्री रोग, निदान व प्रतिबंध, पोटाचे विकार दंत व मुखरोग यांची तपासणी, तसेच हिवताप व कीटकजन्य आजार वंध्यत्व व व्यसन नियंत्रण कुटूंब नियोजन, आरोग्य शिबिर शिक्षण याबाबत समुपदेशन आहाराविषयक मार्गदर्शन केले गेले.
शिबिरात अस्थिरोग विभाग 437, मेडिसन व हृदयरोग विभाग 695, दंत विभाग 47, सर्जन विभाग 51, बालरोग विभाग 59, नेत्रचिकित्सा 1700, चष्मा वाटप 1000, मोतीबिदू 140, मोती बिंदू शस्त्रक्रियोठी डी. वाय. पाटील हॉस्पिटलला 40 रूग्ण पाठवण्यात आली. स्त्री रोग विभाग 58, नाक कान घसा 60, आयुष विभाग 230, त्वचा रोग विभाग 107, मेदूरोग विभाग 40, क्षयरोग विभाग 11 असे एकूण तीन हजार 515 रूग्णांची तपासणी करण्यात आली. या वेळी सुमारे 1500 रूग्णांच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.
शिबिर यशस्वी करण्यासाठी मिशन हॅस्पिटलचे प्रशासकीय विश्वस्थ रॉबर्ट मोझेस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, वाई ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजू शेडगे तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप यादव, बाबर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सतिश बाबर, मिशन हॉस्पिटलचे डॉ. तोहिद इराणी, डॉ. मिलिदं जोशी, डॉ. सचिन साळुंखे, नेत्र चिकित्सक डॉ. विठ्ठल भोईटे, दंत चिकित्सक डॉ. लांबाडे, आयएमआयचे अध्यक्ष डॉ. अरूण पतंगे, डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्‍टर्स मिशन नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य सुहास थोरात, स्टेला शिर्के, श्वेता शिर्के यांच्यासह विद्यार्थिनी विभागाचे तज्ज्ञ डॉक्‍टर्स यांनी विशेष सहकार्य केले. या आरोग्य शिबिराचा वाई,खंडाळा, महाबळेश्वर आणि जावळी तालुक्‍यातील गरजू रूग्णांनी लाभ घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)