गाव नमुना सहामध्ये मालकी हक्क बदलाच्या नोंदीबाबतच्या कागदपत्रांसाठी चेक-लिस्ट आहे काय?
मालकी हक्क बदलाची नोंद गाव नमुना सहामध्ये नोंदवितांना तलाठी यांनी खालील बाबींची खात्री करावी.
– नोंदणीकृत दस्ताशिवाय व्यवहार झाला आहे काय? (होय/नाही)
– नोंदीसाठी दिलेली कागदपत्रे प्रमाणीत व योग्य आहेत काय? (होय/नाही)
– तुकडेजोड-तुकडेबंदी कायद्याविरुध्द व्ययवहार झाला आहे काय? (होय/नाही)
– परवानगीशिवाय बिगर शेतकरी व्ययक्तीने जमीन खरेदी केली आहे काय? (होय/नाही)
– कुळकायदा कलम 43 चा भंग करुन व्यतवहार झाला आहे काय? (होय/नाही)
– कमाल जमीन धारणा कायद्यीाचा भंग करुन व्यवहार झाला आहे काय? (होय/नाही)
– भूसंपादन कायद्याचा भंग करुन व्यवहार झाला आहे काय? (होय/नाही)
– विविध निरसीत कायद्यांविरुध्द व्यवहार झाला आहे काय? (होय/नाही)
– इतर हक्कातील बॅंक/सोसायटी बोजे असतांना ना हरकत दाखल्याशिवाय व्यवहार झाला आहे काय? (होय/नाही)
– जमिनीचा धारणा प्रकार सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय व्यवहाराला संमती देतो काय? (होय/नाही)
– विविध कायद्यातील तरतुदींविरुद्ध व्यवहार झाला आहे काय? (होय/नाही)
– जमिनीच्या क्षेत्राचा मेळ बसतो काय? (होय/नाही)
तक्रारनोंद चालू असताना संबंधित मंडळ अधिकारी यांचेविरुध्द पक्षकाराने, ते नि:पक्षपातीपणे काम करीत नसल्याचे आरोप करुन, अविश्वास व्यक्त केल्यास काय करावे?
संबंधित पक्षकराला वरिष्ठांकडे अर्ज कीुन प्रकरण दुसऱ्या अधिकाऱ्याकडे वर्ग करुन घेण्याचा अधिकार आहे. किंबहूना नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने स्वत:हून अन्य अधिकाऱ्याकडे प्रकरण वर्ग करण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठविला पाहिजे.
मंडलअधिकारी यांनी फेरफार प्रमाणित करताना काय खात्री करावी?
– सर्व हितसंबंधितांना नमुना 9 ची नोटीस बजावली गेली आहे का?
– संबंधित फेरफार आणि सादर केलेली कागदपत्रे यांतील मजकूर तंतोतंत जुळत आहेत का?
– गाव नमुना सहामधील नोंदीबाबत कोणाची हरकत आहे किंवा कसे?
– गाव नमुना सहामध्ये नोंद केल्यानंतर कायद्यालत नमूद केलेला विशिष्ठ काळ लोटला आहे ना?
– यथास्थिती खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा सादर केला आहे का?
तक्रार नोंद प्रकरण सुरु झाल्याबरोबर पक्षकारांनी तक्रारीतील कागदपत्रे मागितली तर काय करावे?
कोणतीही केस सुरू होताना मूळ तक्रारीच्या प्रती सर्व संबंध्रितांना देणे बंधनकारक आहे. वादीने अशा प्रती सर्व प्रतिवादींना द्याव्यात म्हणून महसूल अधिकाऱ्यांनी स्पष्ट व लेखी आदेश दिले पाहिजेत.
‘अमुक दस्त् हजर करवून घेऊन फेरनोंद करावी, सबब नोंद रद्दा’ असा शेरा प्रमाण अधिकाऱ्याने लिहिणे योग्य आहे काय?
प्रमाणन अधिकायास फेरफार नोंद एकतर प्रमाणित करता येते किंवा रद्द करता येते. फेरनोंद करण्याचा आदेश देणे बेकायदेशीर आहे. फेरनोंद घेण्याच्या तरतुदीबाबत कायद्यात कुठेही उल्लेख नाही. फेरफार प्रकरणात एखादा दस्त कमी असल्यास, तो सादर करण्यासाठी मुदत द्यावी. जरुर तर तसा उल्लेख शेरा स्तंभात करावा. अशा नोंदीबाबत तत्काळ निर्णय घेणे अत्यावश्यक असल्यास ती नोंद कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे रद्द करावी; आणि संबंधिताला त्याबाबत सक्षम अधिकाऱ्याकडे अपील दाखल करण्याचा सल्ला द्यावा.
गाव नमुना सहामधील नोंद प्रमाणित झाल्यानंतर तलाठी यांनी काय कार्यवाही करावी?
प्रमाणन अधिकारी यांनी गाव नमुना सहामधील नोंद प्रमाणित केल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना सात-बारा, गाव नमुना आठ-अ (खातेदारांची नोंदवही) तसेच जरुर त्या इतर सर्व संबंधित गावनमुन्यांवर सदर प्रमाणित गाव नमुना सहानुसार अंमल द्यावा. असा अंमल देतांना संबंधित गाव नमुना सहाचा अनुक्रमांक वर्तुळात नोंदवावा. तसेच आवश्यकता असल्यास गाव नमुना सहामधील नोंदीशी संबंधित सर्व हितसंबंधी व्यक्तींना सदर निर्णयाबाबत कळवावे.