महसूल मंत्र्यांचे ऊस शेतकऱ्यांच्या बद्दलचे प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू – राजू शेट्टी

कोल्हापूर: खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली आहे. ऊस दरावर लवकर तोडगा निघण्याची शक्यता नाही त्यामुळे अांदोलनाची दिशा ठरवण्यासाठी उद्या सांगलीत सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच महसूल मंत्र्यांचे ऊस शेतकऱ्यांच्या बद्दलचे प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू असल्याचीही  टीका देखील राजू शेट्टी यांनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
ते म्हणाले, भाजप सरकारने शेतकऱ्यांना भूलथापा मारल्या अाहेत. शेतकरी समाधानी असले तरच समाधानाने राज्य करता येते. शेतकरी समाधानी नसल्यामुळे कर्नाटकात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपवर तणनाशक फवारणी सुरु झाली अाहे. हा निकाल म्हणजे 2019 च्या निवडणुकीचा ट्रेलर अाहे, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)