महसूल न्यायालयांत 36 हजार दावे

“ईक्‍यूजेकोर्टस्‌’ संकेतस्थळ विकसित : नागरिकांचा त्रास वाचणार

पुणे – जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसिलदार या महसूल न्यायालयात दाखल केलेल्या अपिलांची पुढील तारीख, केसची स्थिती आणि निकालाची प्रत आदी माहिती जाणून घेण्यासाठी आता या कार्यालयांमध्ये न जाता माहिती मिळणार आहे. त्यासाठी शासनाने “ईक्‍यूजेकोर्टस्‌’ हे संकेतस्थळ विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या दाव्यांची माहिती मिळत आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील महसूल न्यायालयांमध्ये 36 हजार दावे दाखल असल्याचे या संकेतस्थळावरून नमूद आहे.

-Ads-

जमिनींना आलेले सोन्यांचा भाव, हद्दीवरून असलेले वाद, सातबारा उताऱ्यामधील चुका आदी कारणांमुळे महसूल अधिकाऱ्यांकडे जमिनींच्या दाव्यांची संख्या वाढत आहे. जमिनीचा वाद, वारस नोंद, सातबाऱ्यावर नाव नोंदणी, इतर हक्कातील नाव कमी करणे, कुळ कायदा नोंद, फेरफार रद्द करणे, जमिनीवरील शासकीय बोजा रद्द करणे, अशा अनेक प्रकरणांसाठी मंडल अधिकारी, नायब तहसिलदार, तहसीलदार, प्रातांधिकारी, अपर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, अपर विभागीय आयुक्त आणि महसूल सचिव यांच्याकडे दाद मागितली जाते.

राज्य शासनाने जमीनविषयक दाव्यांची माहितीसाठी “ईक्‍यूजेकोर्टस्‌’ ही संगणक प्रणाली विकसित केली आहे. तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त या महसूल अधिकाऱ्यांकडे दाव दाखल केल्यानंतर संबधित कारकून याची नोंद ईक्‍यूजेकोर्टस या प्रणालीमध्ये करत आहे. यामध्ये दाव्याचा तपशील, पक्षकारांचा मोबाइल नंबर आदी माहिती भरली जाते. त्यानंतर पक्षकारांना पुढील तारीख कधी याची माहिती देणारा एसएमएस येतो. तसेच दाव्याचा निकाल लागल्यानंतर निकालाची प्रतही “ईक्‍यूजेकोर्टस्‌’वर अपलोड करण्यात येतो. त्यामुळे निकालाची प्रतही घरबसल्या बघता येण्याची सोय यामुळे उपलब्ध झाली आहे.

महसूल अधिकाऱ्यांकडे महिन्याला सरासरी 250 ते 300 अपिलांची सुनावणी होते. यामुळे अर्जदाराला संबधित दाव्यावर पुढील सुनावणी माहिती घेण्यासाठी संबधित महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. त्यासाठी शेतकऱ्याला गावावरून या कार्यालयांमध्ये यावे लागते. अधिकाऱ्यांची अनुपस्थिती किंवा इतर कारणामुळे अनेकदा पुढची तारीख मिळते. यामुळे पक्षकारांना आर्थिक भुर्दंड बसतो. त्यांचा वेळही वाया जातो. त्याचबरोबर मनस्तापही वाढतो. नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी राज्य शासनाने सर्व महसूल कार्यालयांमध्ये “ईक्‍यूजेकोर्टस्‌’ ही प्रणाली सुरू केली आहे.

पुणे जिल्ह्यातील माहिती
एकूण महसूल न्यायालये – 27
दाखल अपिले – 36 हजार 068
निकाली काढलेली अपिले – 17 हजार 867
एकूण पक्षकार – 83 हजार 575


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)