महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

उंब्रज – पश्‍चिम महाराष्ट्र म्हणजे आमची जहागिरी आहे. हे समजाणारांना आता कळतय. त्यांच्या जहागिरीला भाजपने सुरुंग लावला असून कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा जिल्हा भाजपमय होऊ लागल्याने विरोधकांना धडकी भरली आहे. भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांसाठी वाट्टेल ते करणारा पक्ष असून प्रेम, आत्मसन्मान फक्त इथंच मिळते, असे प्रतिपादन राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

उंब्रज, ता. कराड येथील बाजारपेठेत आयोजित महेशकुमार जाधव यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुलबाबा भोसले, भाजप जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर, अनिल देसाई, भरत पाटील, मनोज घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. पाटील म्हणाले, सर्वसामान्य जनतेला सुखी, आनंदी करण्यासाठी भाजपा काम करत आहे. नुकत्याच झालेल्या तीन राज्यांतील निवडणूकांमध्ये मिळालेल्या निसटत्या यशाने विरोधक हुरळून गेले आहेत. त्यांना स्वर्ग दोन हाथ राहिला असे वाटते. पण गेली साडे चार वर्षांत भाजप सर्वच ठिकाणी विजयी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पश्‍चिम महाराष्ट्र म्हणजे आमची जहागिरी आहे असे समजणारांना आता कळतय त्यांच्या जहागिरीला भाजपने सुरुंग लावला असून कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा भाजपमय होऊ लागल्याने विरोधकांची झोप उडवणारे हे पक्ष प्रवेश आहेत. भाजपाने आपल्या कामामुळे लोकप्रिय होऊन सामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण केले आहे. महेशबाबांनी सांगितलेली या विभागातील रखडलेली कामे प्राधान्याने करणार असल्याचे ना. पाटील यांनी यावेळी सांगितले.

पक्ष प्रवेशानंतर बोलताना ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन महेशकुमार जाधव म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील विकास गेली अनेक वर्षे रखडला असून विविध योजनांचे नुसते नारळ फोडून नुसती आश्वासन देऊन जनतेची भ्रम निराशा केल्याने या भागातील जनतेला आता नुसती आश्वासन नको तर प्रत्यक्षात विकास पाहिजे व तो फक्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होऊ शकतो. म्हणूनच मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यापुढेही कोणत्याही अपेक्षा न ठेवता मतदार संघाचा विकास हाच केंद्रस्थानी मानून कार्यरत राहणार असल्याचे जाधव यांनी सांगीतले. याप्रसंगी विभागातील अनेकांनी पक्ष प्रवेश केला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)