महर्षि संकुलामध्ये साकारणार दिल्लीचा लाल किल्ला

अकलूज- शंकरनगर येथील महर्षि शंकरराव मोहिते-प्रशाला, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला व महर्षि प्रशाला प्राथमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षि संकुलामध्ये देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्‌याची प्रतीकृती साकारणार असल्याची माहिती मुख्याध्यापक डी. एल. मगर यांनी पत्रकारांना दिली.
मगर यांनी सांगितले की, सन 2017-18 हे शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक स. म. शंकरराव मोहिते-पाटील यांचे जयंती शताब्दी वर्ष आहे. त्या निमित्त संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, जि. प. सदस्या स्वरुपाराणी मोहिते-पाटील, संग्रामसिंह मोहिते-पाटील, ऍड.नितीन खराडे यांचे मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक एस. एम. पारसे, मुख्याध्यापिका उज्वला शेलार यांचे संकल्पनेतून महर्षि संकुलामध्ये देशाचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने 70 फूट लांब व 25 फूट उंच अशी लाल किल्ल्याची भव्य प्रतीकृती रोखण्यात येणार आहे. तसेच तीनही प्रशालेतील सुमारे 3500 विद्यार्थी सामूहिक कवायत करणार आहेत. यावेळी 50 विद्यार्थी लेझीम खेळाचे सादरीकरण करणार तर 500 विद्यार्थी संचलन करणार असून यामध्ये आरएसपी, स्काऊट, गाईड, छात्रसेनेचे विद्यार्थी -विद्यार्थिनींसह लक्ष्मीबाई कन्या प्रशालेचे विद्यार्थिनींचे घोषपथक सहभागी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)