महर्षिनगरात थरार; भरधाव कारचालकाने दिलेल्या धडकेत चौघे जखमी

पुणे/सहकारनगर – भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत चार जण जखमी झाले आहेत. या अपघातात पार्क केलेल्या टेम्पोसहित तीन दुचाकींनादेखील उडविले. यातील 20 वर्षीय कार चालकास स्वागरगेट पोलिसांनी अटक केली आहे. हा भीषण अपघात महर्षिनगर परिसरातील झांबरे पथ येथे घडला.

मोहीत धूत (20) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. तर या अपघातात साक्षी रमेश तिवारी व रिना विनय पालरेशा या गंभीर जखमी असून राजेंद्र किसन रेणुसे व रिती सचिन पालरेशा हे दोघे किरकोळ जखमी आहेत. कारचालक तरुण शिवाजीनगर येथील एका हॉस्टेलमध्ये रहायला असून महर्षिनगर येथे एका मित्राला भेटायला आला होता. तो क्रेटा गाडीने जात असताना त्याचा दुचाकीवरील एका व्यक्तीशी वाद झाला. दुचाकीवरील व्यक्ती आक्रमक झाल्याने मारेल या भीतीने मोहितने क्रेटा तेथून निघण्यासाठी गाडी जोरदार पळवली.

मात्र, यादरम्यान, त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील टेम्पो, दुचाकी वाहनांसह व पादचारी महिलांना धडक दिली. हा अपघात पाहताच घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी त्याला चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी टेम्पोचालक राजेंद्र किसन रेणुसे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) मचिंछद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अबुजर चाऊस पुढील तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)