महमंद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज वाहतुकीत बदल

पुणे – महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि.21) शहरात ठिकठिकाणी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

नाना पेठ येथून मुख्य मिरवणुकीला सुरवात होणार असल्याने येथील काही मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. तसेच, या परिसरात वाहन पार्किंगलाही बंदी घालण्यात आली आहे.

-Ads-

मिरवणूक सुरू झाल्यानंतर रास्ता पेठ पॉवर हाउस ते संत कबीर चौक या दरम्यानची वाहतूक समर्थ पोलिस स्टेशन-क्वार्टर गेट या मार्गे सोडण्यात येणार आहे. मिरवणूक संत कबीर चौकात असेपर्यंत येथून लक्ष्मी रस्त्याला जाणाऱ्या वाहनांना नाना चावडी चौकातून वळवून रास्ता पेठ पॉवर हाउसमार्गे सोडण्यात येईल. वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

असा असेल मुख्य मिरवणुकीचा मार्ग
मुख्य मिरवणूक नाना पेठेतील मशिदीपासून निघणार आहे. ती संत कबीर पोलिस चौकापासून ए. डी. कॅम्प चौक, तेथे डावीकडे वळून भारत सिनेमा, पद्मजी पोलीस चौकी, निशांत सिनेमा, भगवानदास चाळ, चुडामण तालिम, कुरेशी मशिदीमागील जॉन महमंद स्ट्रीट, बाबाजान दर्गा, चारबावडी पोलीस चौकी, भोपळे चौक, पुलगेट, महात्मा गांधी रस्त्याने महमंद रफी चौक, महावीर चौकातून डावीकडे वळून महात्मा फुले चौक, संत कबीर पोलिस चौकी, नाना चावडी चौक, महाराणा प्रताप रस्त्याने गोविंद हलवाई चौक, सुभानशहा दर्गा चौक, सिटीजामा मशीद येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)