महत्वाच्या खेळाडूंना सक्तीची विश्रांती मिळणार ; विश्‍वचषकापुर्वी बीसीसीआयची खबरदारी 

नवी दिल्ली: 2019 मध्ये होणारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लक्षात घेता विराट कोहलीसह अन्य खेळाडूंना काही सामन्यांत विश्रांती दिली जाऊ शकते. भारतीय संघ व्यवस्थापनाने विश्वचषक स्पर्धेत भारताच्या प्रमुख खेळाडूंना तंदुरूस्तीचा प्रश्न उद्भवू नये याकरिता या निर्णय घेतल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. 
2019 साली होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने आतापासूनच खबरदारी घेण्यासाठी सुरुवात केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकात विश्रांती देण्यात आली होती. यानंतरही आगामी टी-20 आणि वन-डे मालिकांसाठी संघातील महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्‍यता आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह यासारख्या महत्वाच्या गोलंदाजांना आगामी मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. 
विश्‍वचषकासाठी विराट कोहली पूर्णपणे तंदुरुस्त हवा असेल तर त्याला पुन्हा एकदा विश्रांती दिली जाऊ शकते. आगामी विश्‍वचषकासाठी सर्वोत्तम संघ मैदानात उतरावा यासाठी बीसीसीआय रोटेशन पॉलिसी अवलंबत असल्याचं, एका अधिकाऱ्याने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. संघातील महत्वाच्या खेळाडूंवर अतिक्रिकेटचा भार येऊ नये यासाठी भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहला विंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. 
दरम्यान, विराटला आशिया चषक 2018 स्पर्धेत विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने संघाची धुरा सांभाळली होती आणि संघाला जेतेपदही जिंकून दिले होते. विराटला याआधी निदाहास चषक स्पर्धेतही विश्रांती देण्यात आली होती. दुखापतीमुळे त्याला कौंटी क्रिकेट स्पर्धेलाही मुकावे लागले होते. 
तर, कसोटी मालिकेतंनतर भारतीय संघ विंडिजविरुद्ध वन-डे आणि टी-20 मालिका खेळेल. यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही भारतीय संघाला वन-डे, टी-20 मालिका खेळायची आहे. मात्र या सर्व दौऱ्यांमध्ये भारतीय संघाला विश्रांतीसाठी फार कमी दिवस मिळणार आहेत. याचसोबत 2019 मध्ये विश्‍वचषकासाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंना आयपीएलमध्येही सहभागी व्हायचंय. या सर्व मालिकांचा विचार केला असता बीसीसीआय महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्याच्या विचारात आहे. 
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)