महंमद पैगंबरांनी जगाला शांतीचा संदेश दिला

मौलाना गनी ः अकलूज येथे पैगंबर जयंती उत्साहात

अकलूज- महंमद पैगंबरांनी जगाला शांततेचा संदेश दिला असून, त्यांची जीवनशैली अनुकरणीय आणि आदर्शवत आहे. त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार वाटचाल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महंमद पैगंबर जयंतीनिमित्त सुन्नी जमात दर्गा मस्जिद यांच्या वतीने विजय चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मौलाना गनी केले.
याबरोबरच पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लीम बांधवांनी सामाजिक उपक्रम राबवून देशात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे अनुकरण करून इतरांनीसुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी पक्षनेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले. अकलूज शहर आणि परिसरातील मुस्लीम बांधवांच्या वतीने पैगबंर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लीम बांधवासाठी शुभेच्छा देण्यासाठी धैर्यशील मोहिते-पाटील आले होते. याप्रसंगी पाणी जपून वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ सदस्य किशोरसिंह माने पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती कुंभार, प. स. सदस्य कमाल शेख, डॉ. शब्बीर जमादार, मौलाना जाकीर, मौलाना कारी शफिक, मौलाना नियाज, मौलाना रफिक कादरी, मौलाना तय्यब अली, मौलाना आब्दुल्ला, मौलाना रुबाब, मौलाना कमरे आलम आदीसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी कुराण शरीफची तिलावत पठण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर बज्मे अन्वरे सुफियी मदरसाच्या विद्यार्थ्यांनी पैगंबर यांच्या जीवनावर नात शरीफ सादर केली.
तत्पूर्वी अकलूज परिसरातील मुस्लिम बांधवांनी अकलुज शहरातून पैगंबर जयंतीनिमित्ताने मिरवणूक काढली. मिरवणुकीत मुस्लीम धार्मिक स्थळांच्या प्रतिकृती सादर केल्या होत्या. मिरवणुकी दरम्यान विविध सामाजिक संघटनाच्या वतीने शरबत,मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते विविध सामाजिक कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. जुलुसचे नियोजन हाजी जमीर तांबोळी, खलील बागवान, इब्राहिम शेख, डॉ. वजीर शेख, भय्या मुलाणी, अकबर तांबोळी, बाशु शेख यांनी केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)