मस्साजोग जवळ ट्रॅक्टरच्या अपघातात दोघे जागीच ठार

केज – केज कडून काळेगावकडे ट्रॅक्टर घेऊन जाताना मस्साजोग जवळील जिनिंग जवळ झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडलीये. काळेगाव येथील वसंत शाहू कोठावळे (वय ३५) आणि दिनकर व्यंकटराव घुले (वय ४५) हे दोघे बुधवारी रात्री ८ वाजता केजहून काळेगावकडे निघाले होते.

ते मस्साजोग जवळील जिनिंग जवळ आले असता अज्ञात कारणामुळे ट्रॅक्टर रोडच्या बाजूला खड्ड्यात जाऊन पलटी झाले. यामध्ये काळेगाव येथील रहिवासी वसंत कोठावळे व आरणगावं येथील माजी सैनिक दिनकर घुले हे दोघे जागीच ठार झाले. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला हे मात्र अद्याप समजू शकले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)