मस्तीची भांग चढली असेल तर नाणार प्रकल्प रेटून दाखवाच : उद्धव ठाकरे

मुंबई :  कोकणातील नाणार प्रकल्पावरून सध्या शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचे दिसत आहे. कारण, आता या प्रकल्पावरून सेनेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. ‘तुमच्या डोक्यात मस्तीची भांग इतकी चढली असेल तर नाणार प्रकल्प रेटून दाखवाच’, असे थेट आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत सेना-भाजप नेत्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

सोमवारी नाणार प्रकल्पातील भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. मात्र, त्यानंतर लागलीच भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार कुठल्याही मंत्र्याला नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा तोंडघशी पडली. त्यानंतर आज ‘सामना’तून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिले आहे.

‘तुमच्या डोक्यात मस्तीची भांग इतकी चढली असेल तर हा प्रकल्प पुढे रेटून दाखवाच. सुभाष देसाई हे कॅबिनेट मंत्री आहेत. भूसंपादन अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय त्यांनी संबंधित खात्याचे मंत्री म्हणून घेतला आहे. हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. धर्मेंद्र प्रधान या केंद्रीय मंत्र्याने रिफायनरीच्या अरबी मालकांबरोबर ‘एमओयू’ करताच मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ‘हा प्रकल्प नाणारला येणारी रिफायनरी नाही.’ पण ते खोटे बोलले असे आता स्पष्ट झाले आहे. जर धर्मेंद्र प्रधान यांनी वेगळय़ाच कंपनीशी करार केला असेल तर मुख्यमंत्री नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा का करीत नाहीत. भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी हा प्रकल्प विदर्भात नेण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य करायला हवी.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)