मसूदवरच्या बंदीसाठी अमेरिका पुन्हा सक्रिय : चीनविरोधात दंड थोपटले

संयुक्‍त राष्ट्र – पाकिस्तानस्थित दहशतवादी गट “जैश ए मोहम्मद’ आणि त्या संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहरला संयुक्‍त राष्ट्राकडून दहशतवाद्यांच्या काळ्या यादीमध्ये टाकण्यासाठी अमेरिकेने पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेने या संदर्भातील एका ठरावाचा मसुदा संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये वितरीत केला आहे. त्यामुळे एका अर्थाने अमेरिकेने चीनला थेट आव्हान दिले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला मसूद अझहरवर संयुक्‍त राष्ट्राकरवी बंदी घालण्यासाठीचा प्रस्ताव चीनने रोखला होता. त्यामुळे अमेरिकेने आता मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्यासाठी थेट सुरक्षा परिषदेमध्ये प्रस्ताव आणायचे ठरवले आहे.
पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदने स्वीकारली होती. या हल्ल्यात “सीआरपीएफ’चे 40 जवान शहिद झाले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणावही निर्माण झाला होता.

अमेरिकेने सुरक्षा परिषदेत वितरीत केलेल्या ठरावाच्या मसुद्यात या आत्मघातकी हल्ल्यावर जोरदार टीका केली आहे. अल कायदा आणि इस्लामिक स्टेटसारख्या निर्बंध असलेल्या संघटनांच्या काळ्या यादीत मसूद अझहरला टाकण्याचा निर्णय मांडला आहे. यामुळे मसूद अझहरला जगभर प्रवासास बंदी आणि त्याची मलमत्ता जप्त होईल. अमेरिकेच्या या प्रस्तावाला फ्रान्स आणि ब्रिटनने पाठिंबा

मात्र अमेरिकेच्या या प्रस्तावावर कधी मतदान होईल, हे समजू शकलेले नाही. चीनकडून या ठरावाविरोधात नकाराधिकार वापरला जाऊ शकतो.

“जैश ए मोहम्मद’ 2001 पासून संयुक्‍त राष्ट्राच्या दहशतवादी संघटनांच्या यादीमध्ये आहे. मात्र मसूदला काळ्या यादीत टाकण्याचे चार प्रयत्न होऊन गेले आहेत. त्यापैकी तीन वेळेस चीनने अटकाव केला आणि सर्वात अलिकडच्या प्रयत्नाला तांत्रिक मुद्दयावर खोडा घातला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)