मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांचा गौरव 

पुणे – अल अदिल ट्रेडिंगचे अध्यक्ष डॉ. धनंजय दातार यांना “फोर्ब्ज मिडल ईस्ट’ मासिकातर्फे नुकतेच “टॉप इंडियन लीडर्स इन द अरब वर्ल्ड 2018 – रिटेल वॉर्ड’ पुरस्काराने गौरवण्यात आले. अरब जगतातील आघाडीच्या भारतीय नामवंतांच्या या प्रतिष्ठित यादीत डॉ. दातार यांना 30 वे मानांकन मिळाले आहे. भारताचे संयुक्‍त अरब अमिरातीतील राजदूत नवदीपसिंग सुरी, फोर्ब्ज मिडल ईंस्टच्या संपादक खुलौद अल ओमिया या कार्यक्रमाला उपस्थित होते. डॉ. दातार म्हणाले, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून त्यामागे अल अदिल समूहाचे कर्मचारी आणि ग्राहक यांचा पाठिंबा कारणीभूत आहे.

संयुक्‍त अऱब अमिरातीतील राज्यकर्त्यांच्या पाठबळामुळे आम्हाला कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आले आहे. डॉ. धनंजय दातार यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करणाऱ्या अल अदिल ट्रेडिंगने 9000 भारतीय उत्पादने संयुक्‍त अरब अमिरातीत उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अल अदिल ग्रुपची आखाती देशांत 39 सुपरमार्केट्‌स, दुबई, अबुधाबी, शारजा व अजमान भागात 2 पिठाच्या आधुनिक गिरण्या, 2 मसाला उत्पादन कारखाने असे नेटवर्क विस्तारले आहे आणि मसाला किंग एक्‍स्पोर्टस (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या नावाने मुंबई निर्यात विभागही कार्यरत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)