मशीद हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही – सुप्रीम कोर्ट 

नवी दिल्ली – राम मंदिर-बाबरी मशिद वादाच्या संबंधित मशीद नमाजचा अविभाज्य भाग आहे का? यावर आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे.  मशीद हा इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचा निकाल आज  सर्वोच्च न्यायालायने दिला आहे. शिवाय, हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. आता ३ ऑक्टोबर पासून सर्वोच्च न्यायालय अयोध्या प्रकरणावर सुनावणी सुरु करणार आहे.

तीन बेंचच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. न्या. अशोक भूषण, न्या. दीपक मिश्रा आणि न्या. नजीर यांचा घटनापीठामध्ये समावेश होता. १९९४ साली फारुखी प्रकरणात सर्वोच्च न्यायालायने मशीद हा इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे सरकारने मशीदची जमीन अधिग्रहण करणे घटनाविरोधी नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय अयोध्या जमीन प्रकरण या प्रकरणापेक्षा पूर्णतः वेगळे असल्याचे म्हंटले आहे. यामुळे आता फारुखी प्रकरणाचा अयोध्यवर कोणताही प्रभाव पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी दोन न्यायमूर्तींची मत एका पारड्यात पडले तर दुसरे न्या. नजीक यांनी विरोध दर्शविला.

काय आहे फारुखी प्रकरण –
५ डिसेंबर १९९४ साली एम. इस्माईल फारूकी विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात पाच सदस्यीय पीठाने मशीद हा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार वादग्रस्त जमिनीचे सरकारला अधिग्रहण करता येईल, असे पाच सदस्यीय पीठाने तेव्हा स्पष्ट केले होते. या निकालावर पुनर्विचार केला जावा, अशी मागणी अयोध्या मालमत्ता वादात पुढे आली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आवाज निर्णय दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)