आक्रा (घाना) – मशिदी आणि चर्चेस यांच्यावर लावण्यात आलेल्या स्पीकर्सवर घानामध्ये बंदी घालण्यात आली आहे. अशा अर्थाचे फर्मान शनिवारी जारी करण्यात आले आहे. प्रार्थनेसाठी लोकांना बोलावण्यास जो लाऊडस्पीकर्सचा वापर केला जातो, तो ताबडतोब बंद करावा आणि त्या ऐवजी लोकांना प्रार्थनेसाठी बोलावण्यास सोशल नेटवर्किंगचा वापर करावा असे या फर्मानात सांगण्यात आले आहे. मशिदी आणि चर्चेसवरील लाऊडस्पीकर्समुळे-विशेषकरून शहरी भागात होणारे प्रचंड ध्वनी प्रदूषण कमी करणे हा या फर्मानामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

मशिदी आणि चर्चेसमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे त्यांच्या जवळपासच्या भागात राहणाऱ्या लोकांना फार त्रास होतो,
मशिदीवर लाऊड स्पीकर्स लावण्याऐवजी लोकांना बोलावण्यास सोशल नेट्‌वर्किंगचा वापर करावा अशी सूचना देण्यात आली आहे. सुरुवातीला थोडे त्रासदायक वाटले, तरी यामुळे सर्वांचाच फायदा आहे. याविषयी आपण विचार करू शकतो, असे घानाचे पर्यावरण मंत्री फ्रिमपॉंग बोटेंग यांने म्हटले आहे.

मात्र राजधानी आक्रामधील मुस्लिम समुदायाने याचा विरोध केला आहे. दिवसातून 5 वेळा अजान होते. व्हाट्‌सऍद्वारे मेसेज देण्याने ध्वनी प्रदूषण कमी होईल, परंतु त्याचा आर्थिक परिणाम होणार आहे. इमामना पगार मिळत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)