मशिदीच्या शाही इमामाचा मोदींविरोधात फतवा

कोलकाता : टीपू सुल्तान मशिदीचे शाही इमाम नरून रहमान बरकती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एका फतवा प्रसिद्ध केला आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या फतव्याने साऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापची लाट पसरली आहे. सात जानेवारीला इमाम बरकती यांनी तृणमूल कॉंग्रेसचे खासदार इद्रीस अली यांच्या उपस्थितीमध्ये मोदींविरोधात फतवा प्रसिद्ध केला. त्या फतव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार करणाऱ्याला 25 लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. शिवाय भाजपचे कार्यकर्ते दिलीप घोष यांच्यावर दगडफेक करून त्यांना राज्याबाहेर हाकला असाही उल्लेख फतव्यात करण्यात आला. याप्रकरणी खासदार इद्रीस अली यांच्यासह शाही इमामांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. पण इमाम बरकत अली ममता बॅनर्जींच्या अत्यंत महत्वाच्या सल्लागारांपैकी एक असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप आता भाजपने केला आहे. एस्सेल समूहाचे प्रमुख आणि खासदार सुभाष चंद्रा यांनीही इमाम बरकती यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)