मळोली -निमगाव रस्त्यासाठी अडीच कोटीचा निधी मंजुर

अकलूज- मळोली-निमगाव (ता. माळशिरस) या सहा किलोमीटर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले होते. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करून, निवेदने पाठवून रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती, त्यास यश येऊन मंत्रिमंडळात या रस्त्यासाठी अडीच कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याची माहिती मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण साठे यांनी दिली.
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी 15 डिसेंबर 2017 पूर्वी महाराष्ट्रामधील कोणत्याही रस्त्यावर खड्डे दिसणार नाहीत, असे हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितले होते. मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नव्हते,त्याच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने मळोली ते निमगाव रस्त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव देण्याचे आणि त्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार हनुमंत डोळस यांची नावे देण्याचे आंदोलन मनसे जिल्हा उपाध्यक्ष किरण साठे यांनी 16 डिसेंबर 2017 रोजी मळोली येथे केले होते. त्या मागणीची दखल घेऊन सध्या चालू असलेल्या अधिवेशनामध्ये मळोली ते निमगाव या रस्त्याच्या कामासाठी अडीच कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे त्यामुळे येथून जाताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मनसे आंदोलनाची दखल घेऊन जो निधी सरकारने उपलब्ध व मंजूर केला आहे ,त्यामुळे या दोन्ही गावामधील जनतेला दळण वळण साठी होणारा त्रास थोड्याच दिवसात संपणार आह. यावेळी मनसे माळशिरस तालुकाध्यक्ष बापू वाघमारे, माळशिरस तालुका संघटक धनाजी पाटील, तालुका सरचिटणीस राजू रासकर, तालुका उपाध्यक्ष नवनाथ ननवरे, महिला सेना अध्यक्ष रुक्‍मिणी रणदिवे, समाधान खुडे, अकलूज शहर अध्यक्ष सुदाम आवारे, सरचिटणीस सोमनाथ शेळके, संघटक नाना खंडागळे, नातेपुते शहर अध्यक्ष अजित पवार, नातेपुते उपाध्यक्ष बाबा वाघमारे, कार्यध्यक्ष कालिदास माने, इस्लामपूर विभाग अध्यक्ष संतोष शिंदे, महिला सेना माळशिरस विभाग अध्यक्ष शारदा शेगर, मनविसे शहर अध्यक्ष रवी कांबळे, माळेवाडी शाखा अध्यक्ष चंद्रकांत शेळके विकी केसकर,सैलानी सय्यद उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)