मळीमिश्रित पाण्यामुळे तिळगंगेतील मासे मृत

कोरेगाव, दि. 5 (प्रतिनिधी) – कोरेगाव येथील चिमणगाव परिसरातील जरंडेश्वर साखर कारखान्याचे मळीमिश्रीत दूषित पाणी कुमठे गावच्या तीळगंगा ओढ्यात सोडल्यामुळे तीळगंगा ओढ्यावरील बंधाऱ्यातील मासे मृत पावले आहेत. कुमठे बंधाऱ्यावर असणारी कुमठे गावची नळपाणी पुरवठा योजना मळीमिश्रीत दूषित पाण्याने धोक्‍यात आली आहे. तीळगंगा ओढ्यात सोडलेल्या मळीमिश्रीत पाण्यामुळे कुमठे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.
कोरेगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी प्रदूषण मंडळाने वेळोवेळी सूचना, समज देऊनही साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने तीळगंगा ओढ्यात सोडले. मळीमिश्रीत दूषित पाण्यामुळे कुमठे गावच्या तीळगंगा ओढ्यावरील बंधारा दोषीचा लावणी या बंधाऱ्यातील व ओढ्यातील मासे मरण पावले. एवढेच नव्हे तर जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मळीमिश्रीत पाण्यामुळे बंधाऱ्यावर अवलंबून असणारी तीळगंगा ओढ्यावर असणारी कुमठे गावाची नळ पाणीपुरवठा योजना धोक्‍यात आली. या मळीमिश्रीत दूषित पाण्यामुळे कुमठे गावचे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)