मळवली सदापूर ग्रामपंचायत उपसरपंचपदी कोयना शेडगे

कार्ला – मळवली सदापूर ग्रुप-ग्रामपंचायत उपसरपंचपदी कोयना शिरीष शेडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अस्लमभाई शेख यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच सुनंदा गोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

निर्धारित वेळेत कोयना शेडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यक्ष सरंपच गोरे व निर्णय अधिकारी ग्रामसेवक पठाण यांनी शेडगे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी सरपंच गोरे, माजी उपसरपंच अस्लम शेख, ग्रामपंचायत सदस्या विद्या तिकोणे, प्रियंका जीर, रिना साबळे, जमुना पटेकर, सोनाली ढाकोळ, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम ठोसर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दिपक हुलावळे, तुफैल शेख, बाळासाहेब भानुसघरे, पांडुरंग साबळे, हेमंत जीर, शांताराम तिकोणे, दत्ता केदारी, प्रहर्षण भावसार, गुलाब तिकोणे यांनी प्रयत्न केले. शेडगे यांची उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर किरण हुलावळे, नरेंद्र वाल्हेकर, अमोल केदारी, गणेश तिकोणे, प्रशांत शेडगे, योगेश शेडगे, शिवराज दिघे, विनायक हुलावळे, भाऊ हुलावळे, निशांत शेडगे, अमर शेडगे यांच्यासह मळवली सदापूर ग्रामस्थांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)