मळद येथील तलाव कोरडा

कुरकुंभ- दौंड तालुक्‍यातील कुरकुंभ, मळद, पांढरेवाडी परिसराकडे पावसाने पाठ फिरवल्याने मळद येथील पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या पाझर तलावातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. काही दिवस पुरेल इतकाच पाणी साठा तलावात शिल्लक असून येणाऱ्या काही दिवसात पाऊस झाला नाही तर तलाव कोरडा पडेल.
दौंड तालुक्‍यातील कुरकुंभ, पांढरेवाडी, जिरेगाव, मळद परिसरात पावसाने एकदाही जोरदार हजेरी लावलेली नाही. ओढ्याला पाणी न आल्यामुळे बंधारे कोरडे पडले आहेत. या तलावातील पाणी साठवण क्षमता जास्त आहे, त्यामुळे या तलावातील पाण्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होतो. पावसाळ्यात तलाव तुडुंब भरल्यानंतर परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागतो. परंतु, हा तलाव कोरडा पडल्याने तलावातील पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जळू लागली आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे, त्यामुळे तलावात कालव्यामधून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)