मळगंगा वाचनालयाचे कार्य उल्लेखनीय – गावडे

टाकळी हाजी- मळगंगा बारभाऊ बलुतेदार वाचनालय मंडळाचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी केले. वाचनालयाच्या विविध ग्रंथ पुस्तके व दिवाळी अंकाच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. मळगंगा वाचनालयाच्या वतीने वाचकांसाठी अनेक पुस्तके व ग्रंथ उपलब्ध असून वाचकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे गावडे यांनी सांगितले. ग्रंथालयात दहा हजारांपर्यंत पुस्तके असून सर्व प्रकारची मासिके पेपर, उपलब्ध असल्याचे धोंडीभाऊ जाधव यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाला मनीषा किऱ्हे, अरुणा जाधव, प्रवीण गुगळे, दत्तात्रय चिकटे, संपत जाधव, सुरेश किरहे, बाबाजी गावडे, खंडू जाधव, नंदू काळे व ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)